22 रोजी बांदा गावातील मंदिरांमध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…

प्रभू श्री रामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमित्त.

बांदा/प्रतिनिधी
सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी समस्त विश्वातील भारतीयांचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान, शक्तिस्थान असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थानी अर्थात अयोध्या येथे रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून बांदा गावातील सर्व मंदीरांमध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
समस्त विश्वातील हिंदु धर्मियांकरीता हा दिवस दिवाळी-दसरा याप्रमाणेच आनंदोत्सव असुन, आपण सर्व बांदावासिय बंधु-भगिनींनी या सुवर्णदिनाच्या आनंदोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी ७ ते १० या वेळेत श्रीराम मंदीर, पानवळ येथे श्री राम व पंचायतन मुर्ती अभिषेक, श्री देव बांदेश्वर मंदीर येथे लघुरुद्र व अभिषेक, श्री विठ्ठल मंदीर, उभाबाजार येथे प्रभु श्री रामचंद्रांच्या प्रतिमेचे पुजन, श्री गणेश मंदीर, गवळीटेंब येथे अभिषेक पुजन, श्री मारुती मंदिर, उभाबाजार येथे अभिषेक पुजन, सकाळी ८.३० ते ११.१५ या वेळेत मारुती मंदिर, उभाबाजार येथे समस्त रामभक्त हिंदूंचा मेळा व तिथुनच बांदा शहरातुन आनंद उत्सव फेरी. सकाळी ११ ते ११.१५ या वेळेत श्रीराम मंदीर, पानवळ येथे घंटानाद व शंखनाद, श्री देव बांदेश्वर मंदीर येथे घंटानाद, श्री विठ्ठल मंदीर, उभाबाजार येथे घंटानाद, श्री गणेश मंदीर, गवळीटेंब येथे घंटानाद, श्री मारुती मंदिर, उभाबाजार येथे घंटानाद. सकाळी ११.१५ ते १२.३० या वेळेत श्रीराम मंदीर, पानवळ येथे रामनाम जप व रामरक्षा पठण, श्री देव बांदेश्वर मंदीर येथे रामनाम जप व रामरक्षा पठण, श्री विठ्ठल मंदीर, उभाबाजार येथे रामनाम जप, श्री गणेश मंदीर, गवळीटेंब येथे रामनाम जप व रामरक्षा पठण, श्री मारुती मंदिर, उभाबाजार येथे रामनाम जप. दुपारी १२.३० वाजता श्रीराम मंदीर, पानवळ येथे श्रीराम आरती, श्री देव बांदेश्वर मंदीर येथे आरती, श्री मारुती मंदिर, उभाबाजार येथे आरती. दुपारी १२.४५ ते ३ या वेळेत श्रीराम मंदीर, पानवळ येथे महाप्रसाद, श्रीदेव बांदेश्वर मंदीर येथे महाप्रसाद. दुपारी ३ ते ५ या वेळेत श्रीराम मंदीर, पानवळ येथे पेडणे, गोवा येथील भजन. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत श्रीराम मंदीर, पानवळ येथे भजन, श्री देव बांदेश्वर मंदीर येथे बांदा महीला मंडळ प्रासादिक भजन, श्री विठ्ठल मंदीर, उभाबाजार येथे राममंत्राचा ५ माळा जप. रात्रौ ९ नंतर श्रीराम मंदीर, पानवळ येथे धुपारती, श्रीदेव बांदेश्वर मंदीर येथे श्री देव बांदेश्वर पालखी प्रदक्षिणा कार्यकार्य होणार आहेत.
या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page