नट वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा शुभारंभ…

बांदा/प्रतिनिधी
नट वाचनालय, बांदा व गोगटे वाळके महाविद्यालय पानवळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नट वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष श्री सावंत, गोगटे-वाळके कॉलेज पानवळचे प्रा. अनिल शिर्के, प्रा. प्रसाद जाधव, वाचनालयाचे संचालक प्रकाश पाणदरे, अंकुश माजगांवकर, अनंत भाटे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


यावेळी साने गुरूजींच्या समग्र साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्याचे उ‌द्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनंत भाटे, प्रा. अनिल शिर्के, प्रा. प्रसाद जाधव, प्रकाश पाणदरे यांनी मराठी भाषा संवर्धनाविषयी आपले विचार मांडले. प्रा. प्रसाद जाधव यांनी स्वरचित कविता मादर केली.
या कार्यक्रमाला वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक सुधीर साटेलकर, महिला संचालिका स्वप्नीता सावंत तसेच गुरुनाथ नार्वेकर व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सचिव राकेश केसरकर यांनी आभार मानले. यावेळी नट वाचनालय, बांदा व गोगट-वाळके कॉलेज, पानवळ-बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या निबंधलेखन स्पर्धेविषयी माहिती देण्यात आली. सदर स्पर्धेसाठी ‘सजग पालकत्व’, ‘समाजमाध्यमे – बरे-वाईट परिणाम’, व वाचनाबावत उदासिनता कारणे व उपाय’ या विषयापैकी कोणत्याही एका विषयावर स्पर्धकांनी १५०० शब्दात निबंध लिहून दिनांक ३१ जानेवारी पर्यंत वाचनालयात आणून द्यावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले.

You cannot copy content of this page