मडुरा रेल्वे स्थानकात दंडवतेंचे तैलचित्र लावण्यास परवानगी द्या…

मडुरा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी..

⚡बांदा ता.१८-: कोकण रेल्वेचे शिल्पकार कै. मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त दि. 21 जानेवारी रोजी मडुरा रेल्वे स्थानकात दंडवते यांचे तैलचित्र लावण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटना मडुरा यांनी केली आहे.


कोकण रेल्वेला प्रशासनास तशा आशयाचे पत्र संघटनेचे अध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी स्टेशन मास्तर समिल परब यांच्याकडे दिले. यावेळी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, रिक्षा चालक पेद्रु डिसोजा, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा केणी, सदानंद नाईक, संजय परब तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
रविवारी 21 जानेवारी रोजी कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त त्यांचे तैलचित्र रेल्वे स्टेशन इमारतीमध्ये लावण्याचा मानस कोकण रेल्वे प्रवासी संघटना मडुरा यांनी केला आहे. यासंदर्भात परवानगी मागण्यासाठी आज कोकण रेल्वे प्रशासनाकडे निवेदन सादर केले.

You cannot copy content of this page