श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत भाजपच्यावतीने विविध कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.१७-: अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा या कार्यक्रमाचे औचित्य साधून भाजप पक्षाच्यावतीने मोहिनी मडगावकर व महिला मोर्चा भाजप सावंतवाडी आयोजित सावंतवाडीकरांसाठी
भोसले उद्यान येथे 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

दुपारी १२ वाजता श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेच विधीवत पूजन, तीर्थप्रसाद, सायंकाळी ५ वाजल्यापासून महिला मोर्चा सावंतवाडी कडून सावंतवाडी तालुक्यातील सर्व महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी ७ वाजता पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, दीपोत्सव, महिलांसाठी खास आकर्षण म्हणजे खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. आहेत. सर्व महिलांसाठी लकी ड्रॉ स्पर्धा पण घेण्यात येणार आहेत. यामध्ये विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन भाजप महिला अध्यक्ष मोहिनी मडगावकर, सरचिटणीस मेघना साळगावकर, ज्योती मुद्राळे, सविता टोपले व महिला मोर्चा कडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page