मळगाव येथे विषारी घणसास जीवदान…

सर्पमित्र आनंद राणे यांनी पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात..

⚡सावंतवाडी ता.१७सहदेव राऊळ -: मळगाव रस्तावाडी येथील मारुती बांदेकर यांच्या घराच्या अंगणात आलेल्या विषारी घणसास निवृत्त सैनिक तथा सर्पमित्र आनंद नाना राणे यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
गेले काही दिवस हा विषारी घणस येथील रहिवाश्यांना रात्रीच्या वेळी भर रस्त्यात दिसत असल्याने त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. शाळेतील मुलांनाही शाळेत जाता येता हा घणस अधूनमधून दिसत असल्याने त्यांच्यामध्ये सुद्धा भीती पसरली होती. आज हा विषारी घणस बांदेकर यांच्या अंगणात दिसून आल्यावर त्यांनी प्रणिमित्र आनंद राणे यांच्याशी संपर्क साधला असता राणे यांनी तेथे जात त्या विषारी घणसास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. राणे हे सर्पमित्र असल्याने या अगोदरही त्यांनी कोब्रा, विषारी नाग, नागीण, मणीयार, फुरसे, अजगर असे प्राणी पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले. हे सरपटणारे प्राणी जमिनीवरील देवाने निर्माण केलेले वरदान असून भीतीपोटी त्यांना मारू नका, आपल्याशी ९४०५२९९०८१ या नंबरवर संपर्क साधा, मी केव्हाही या सेवेसाठी तत्पर आहे, असे आवाहन राणे यांनी केले.

You cannot copy content of this page