तळेरे येथे 29 रोजी रक्तदान शिबिर

⚡कणकवली ता.२८-: स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय आणि जिल्हा रक्त पेढी, सिंधुदुर्गच्यावतीने बुधवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते दू. 1 वा. पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दोनदा रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. याशिवाय अनेक सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, शेती आणि सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात. तर तळेरे पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांनी लक्ष वेधलेल्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचे अशाही सामाजिक उपक्रमाला नेहमीच सहकार्य असते. बुधवारी जिल्हा रक्तपेढी यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. याहीवेळी रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page