⚡सावंतवाडी ता.२८-: सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये ‘बालदिन’ मंगळवार दि . २८ नोव्हेंबर २०२३ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमीत्त प्रशालेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी परिपाठ सादर केला. यावेळी विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्त्व सांगण्यात आले . याप्रसंगी विद्यार्थ्यांचे आवडते कार्टून मिकी माऊस व युनिकॉर्न यांच्या आगमनाने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला . त्यांनी विद्यार्थ्यांसोबत नृत्य करून त्यांचे मनोरंजन केले . तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे व नवोपक्रमांचे आयोजन केले होते .सर्व विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाला प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम . निर्मला हेशागोळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .सर्वांनी विद्यार्थ्यांना ‘बालदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या . मिकी माऊस व युनिकॉर्न ही गमतीदार पात्रे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. विद्यार्थ्यांचा आनंद पाहून उपस्थित पालकांनी प्रशालेचे कौतुक केले .
सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये ‘ बालदिन ‘ उत्साहात साजरा
