नाईक मराठा मंडळाकडून अभिनेत्री नमिता गावकर यांचा सन्मान…

⚡मालवण ता.२८-:
मराठीतील आद्य चरित्रकार, विचारवंत, महाराष्ट्राचे वाङमय महर्षी स्व. गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी १९२६ साली स्थापन केलेल्या मुंबईतील नाईक मराठा मंडळाच्या वतीने सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात मालवण तारकर्ली येथील आणि टीव्ही मालिका ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिका फेम अभिनेत्री सौ. नमिता गावकर यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

नाईक मराठा मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सावंतवाडी व पणदूर यां ठिकाणी आयोजित कार्यक्रमात देवळी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, पदवी व पदव्युत्तर मुलांना पुढील शिक्षणासाठी कर्जाऊ शिष्यवृत्ती, गुणवंत मुलांना पारितोषिके तसेच निराधार महिलांना आर्थिक मदतीचे वाटप तसेच देवळी समाजातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात अभिनेत्री सौ. नमिता गावकर यांचा कला क्षेत्रातील कामगिरी व योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल नमिता गावकर यांनी मंडळाचे आभार व्यक्त मंडळाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page