⚡वैभववाडी ता.२७-: खांबाळे येथील श्री.देवी आदिष्टाचा सप्ताह तथा जत्रौत्सव २२ डिसेंबरला होणार आहे.या जत्रौत्सवानिमित्त भव्य भजनस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत सिंधुदुर्ग,रत्नागिरी आणि कोल्हापुर जिल्हयातील भजनी मंडळांना सहभागी होता येणार आहे.स्पर्धेतील प्रथम विजेत्यास १५ हजार १११व चषक,व्दितीय क्रमांकास १० हजार१११ व चषक,तृतीय क्रमांकास ७ हजार१११ व चषक ,चतृर्थ क्रमांकास ५ हजार१११,पाचवे-तीन हजार१११,व चषक अशी बक्षिसे आहेत तर उत्कृष्ट गायक,उत्कृष्ट हार्मोनियम,उत्कृष्ट पखवाज,उत्कृष्ट झांज,उत्कृष्ट कोरस यांना प्रत्येकी १ हजार १११ व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छीणाऱ्या संघानी आपली नोंदणी ३० नोव्हेंबरपुर्वी २०२३ पुर्वी ९४२३३००७३१ या नंबरवर संपर्क साधून करावी असे आवाहन श्री.देवी आदिष्टी देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्यावतीने करण्यात आले आहे.
