बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधचा तुटवडा…

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची घेतली भेट:लवकरच पत्र देऊन प्रशासनाचे लक्ष वेधणार असल्याचे खतीब यांची माहिती…

⚡बांदा ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ओपीडी असलेल्या बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधचा तुटवडा निर्माण झाल्याने आज उपसरपंच जावेद खतीब यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेत माहिती घेतली. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांचे लक्ष वेधणार असल्याचे खतीब यांनी सांगितले.

बांदा आरोग्य केंद्रात दर दिवशी १५० हून अधिक रुग्ण बाह्य तपासणीसाठी येतात. या रुग्णांना रोजची औषधे पुरविताना देखील आरोग्य प्रशासनाची तारांबळ उडते. रोजच्या रुग्णांबरोबरच रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण व गरोदर माता मोठ्या संख्येने आहेत. औषधे कमी पुरवठा होत असल्याची माहिती उपसरपंच खतीब यांना मिळताच त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग व डॉ. मयुरेश पटवर्धन यांची भेट घेत माहिती घेतली. त्यावेळी वस्तुस्थिती पाहली असता औषधचा प्रश्न गंभीर असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत, रत्नाकर आगलावे, शैलेश केसरकर, ज्ञानेश्वर सावंत, यशवंत माधव, अभिजित देऊलकर आदी उपस्थित होते.
लवकरच यासंदर्भात पत्र देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे यावेळी खतीब यांनी सांगितले. औषधच्या मागणीसाठी वैद्यकीय अधिकारी यांनी देखील जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार करण्याच्या सूचना बाळु सावंत यांनी दिल्यात.

You cannot copy content of this page