⚡बांदा ता.२६-: डेगवे येथील श्री देव स्थापेश्वर मंदिर नजीक प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही मधुकर उमाजी देसाई यांच्या घरी मंगळवार दि.२८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प श्री हरिहर नातू बुवा यांचे कीर्तन होणार आहे. यासाठी संगीत साथ म्हणून ऑर्गन स्वप्नील गोरे व तबला गजानन देसाई असणार आहेत. तरी रसिकांनी या कीर्तन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
डेगवे येथे २८ रोजी हरिहर नातू बुवा यांचे कीर्तन…
