संजू परब:ब्रह्मांडनायक दशावतारी नाटकाचे शानदार उद्घाटन..
⚡बांदा ता.२७-: सिहंगर्जना मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. या मंडळाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी असे प्रतिपादन भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले.दरम्यान बांदा येथे सिहंगर्जना मंडळाच्या वतीने ब्रह्मांडनायक दशावतारी नाटकाचे उदघाटन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमोद कामत यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या.दरम्यान माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोदभाई कामत , जावेद खतीब, बाळू सावंत, दिलीप भालेकर यांनी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत, उपसरपंच जावेद खतीब, माजी सरपंच दिपक सावंत, गुरु धारगळकर, भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर, मधुकर देसाई, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, गुरु सावंत, मकरंद तोरसकर, ज्ञानेश्वर सावंत, विघ्नेश सावंत, मंडळाचे अध्यक्ष श्री आरोसकर, सचिन साटेलकर, दशावतार कंपनीचे मालक सचिन पालव, साई कल्याणकर, समीर पालव,मंडळाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
