⚡सावंतवाडी ता.२६ सहदेव राऊळ : मळगाव येथील भूतनाथ देवाचा जागर उत्सव शनिवारी रात्री मानकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
यनिमित्त रात्री मंदिरात भूतनाथ देवाची पूजा, पुराणवाचन, मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा त्यानंतर आड दशावतार सादर करण्यात आले. गावातील सर्व जत्रांना होणारी दशावतार नाटके कोणतेही विघ्न न येता पार पाडावीत या उद्देशाने भूतनाथ मंदिरात जागरावेळी हे आड दशावतार सादर केले जाते. त्यानंतर आरती व गाऱ्हाणे झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले. कित्येक वर्षांची ही परंपरा गावचे मानकरी जोपासत आले आहेत
