⚡मालवण ता.२६-: मालवणातील राजकोट, सर्जेकोट, गवंडीवाडा येथील मच्छिमारांनी आज रत्नागिरी येथे किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे युवा कार्यकर्ते सतीश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली या मच्छिमारांचा हा शिवसेना पक्षप्रवेश झाला.
यावेळी राकेश आडकर, पांडू सावबा, नाना सावजी, संतोष शेलटकर, सहदेव बापार्डेकर, ओंकार खांदारे, फ्रान्सीस नऱ्होना, निलेश चिंदरकर, बाळू भोगवेकर, मिलबट फर्नांडिस, रोहित कवटकर, संतोष देसाई, बाप्पा काळसेकर, शाना फर्नांडिस, ऑलवीन फर्नांडिस, काशु फर्नांडिस, सागर पाटकर, प्रकाश शेट्टीगार, आनंद आचरेकर बबलू पिंटो, रुजारिओ पिंटो यांनी प्रवेश केला.
