⚡वेंगुर्ला ता.२६-: मठ-टांकयेवाडीतर्फे आयोजित केलेल्या दीपावली शो टाईमला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तीन गटात घेतलेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत ४७ स्पर्धकांनी तर वेशभूषा स्पर्धेत १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
मठ गाव मर्यादित शालेय गटात भक्ती सावंत (प्रथम), अखिल तेंडोलकर (द्वितीय), गायत्री कावले (तृतीय), श्रेया नाईक व दुर्वा परब (उत्तेजनार्थ), जिल्हास्तरीय लहान गटात प्रथम-दिशम परब (तुळस) व वैष्णवी मुणनकर (वेंगुर्ला), द्वितीय-निधी खडपकर (सावंतवाडी), तृतीय-स्वरा पावसकर (कुडाळ) व काव्या गावडे (सावंतवाडी), उत्तेजनार्थ-आरव आईर (कुडाळ), अभंग रगजी (अणसूर), दुर्वा पावसकर (कुडाळ), जिल्हास्तरीय खुल्या गटात प्रथम-ईशा गोडकर (शिरोडा) व दिक्षा नाईक (कुडाळ), द्वितीय-मृणाल सावंत (पिगुळी), तृतीय-समर्थ गवंडी (रेडी) व जयेश सोनुर्लेकर (वेंगुर्ला), उत्तेजनार्थ-नंदिनी बिले (सावंतवाडी) व नेहा जाधव (इन्सुली) यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परिक्षण मिताली मातोंडकर व बी.टी.खडपकर यांनी केले. ही स्पर्धा बाळासाहेबांची शिवसेना वेंगुर्ला यांनी पुरस्कृत केली होती. बक्षिस वितरण उभादांडा सरपंच निलेश चमणकर, मठचे माजी सरपंच किशोर पोतदार, माजी उपसरपंच नित्यानंद शेणई, डॉ.सोनाली सावंत, ठाकरे शिवसेना वेंगुर्ला उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, आरोलकर नर्सरीचे शिवराम आरोलकर, ज्येष्ठ नागरिक शिवराम सावंत यांच्या हस्ते झाले.
वेशभूषा स्पर्धेतील बालवाडी ते चौथी गटात प्रथम-आराध्या राऊळ (पोपट), द्वितीय-शुभ्रा भगत (हिरकणी), तृतीय-चिन्मयी आडणेकर (सावित्री), उत्तेजनार्थ-उर्मी परब (महाराज) व श्रीया नाईक (फळ), पाचवी ते सातवी गटात प्रथम-वरदा परब (संभाजी महाराज), द्वितीय-अखिल तेंडोलकर (बोहारीन), तृतीय-गायत्री कावले (झाशीची राणी), खुल्या गटात प्रथम-जयेश सोनुर्लेकर (गरूड), द्वितीय-आरव आईर (वेताळ) व संकेत हळदणकर (रावण) यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परिक्षण संजय पाटील व बि.टी.खडपकर यांनी केले. ही स्पर्धा मठ-टाकयेवाडी येथील लाकूड व्यावसायिक बाबली परब यांनी कै. सिताबाई तुकाराम परब यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली होती.
बक्षिस वितरणानंतर गोवर्धन मंडळ वडखोल यांचे चपयनृत्य, संत लालाजी मंडळाचे समईनृत्य, चिमणी पाखरं ग्रुपच्या दिक्षा नाईक व संजना पवार, वेंगुर्ला येथील राणी सैनी व शांभवी नाईक यांचे ग्रुप डान्स व बाळू दाभोलकर यांचे गीतगायन झाले. दत्तमाऊली दशावतार मंडळाच्या स्वामी समर्थ या नाट्यप्रयोगाने दीपावली शो टाईमची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी के.जी.गावडे, सचिन आईर, बाळू भगत, विनायक जोशी, दिनेश परब, किशोर राणे, लक्ष्मी परब, सिद्धेश सावंत, शैलेश राणे, सुनिल गावडे, दादा घाटकर, हरेश्वर परब, सुयोग जोशी, योगेश गावडे यांनी परिश्रम घेतले.
