सावंतवाडी ता.२५-: पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कार्यरत असणारे गुरुदास गवंडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सावंतवाडी विधानसभा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.तसे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले.
दरम्यान गुरुदास गवंडे यांनी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदाचा कार्यभार सन २०१४ ते सन २०२२ पर्यंत त्यांच्याकडे होता पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाची ध्येयधोरणे त्यांनी अमलात आणली त्यानंतर निगुडे सारख्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून उपसरपंच पद पाच वर्ष सांभाळले याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सावंतवाडी विधानसभा सचिव पदी पक्षाने त्यांची नेमणूक केली..
