⚡कणकवली ता.२५-: कणकवली नगरवाचनालयातर्फे प्रतिवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम चालविले जातात. इयत्ता दहावीच्या विद्यार्थीसाठी संस्कृत व्याकरणासाठीची कार्यशाळा रविवार १७ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० ते १२.३० यावेळेत नगर वाचनालयाच्या आप्पासाहेब पटवर्धन सभागृहात आयोजित केलेली आहे.
पुणे येथील संस्कृत शिक्षिका सौ. आरती विनय पवार या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार असून संस्कृत ( संपुर्ण) च्या अभ्यासक्रमावर ही कार्यशाला आधारीत असेल. व्याकरण हे कोणत्याही भाषेचे मर्मस्थान असते. संस्कृत भाषेच्या संदर्भात तर व्याकरणाला विशेषच महत्व आहे. संस्कृत व्याकरणाचा विद्यार्थ्यांचा पाया पक्का व्हावा व व्याकरणाचे पैकीच्या पैकी गुण कसे मिळवावेत यासाठीच्या कृप्त्या विद्यार्थ्यांना समजाव्यात हा या कार्यशाळेचा हेतू आहे. संस्कृतचा बदललेल्या स्वरूपातील एकूणच पेपर निटनेटका , वेळेचे नियोजन करून कसा लिहावा याविषयीचे मार्गदर्शनही या कार्यशाळेत होणार आहे. परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी एक मार्गदर्शिका या कार्यशाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला दिली जाणार आहे. सभागृहाची आसन मर्यादा दोनशे विद्यार्थ्यांना समाविष्ट करता येईल एवढीच आहे. मागील काही वर्षे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्रवेश’ या तत्वावर दोनशे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. कार्यशाळेच शुल्क रु. ५० एवढे असेल .नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी ग्रथपाल राजन ठाकूर (९४२११३९६८८) यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर वाचनालयाचे अध्यक्ष आम. नितेश राणे व कार्यवाह महंमद हनीफ आदम
पीरखान यांनी केले आहे.
