राजवाडा येथे होत असलेल्या गंधर्वगान कार्यक्रम म्हणजे आनंद…

मंत्री दीपक केसरकर:पंडित मुकुल शिवपुत्र यांचा मंत्री केसरकर यांच्या हस्ते सन्मान..

⚡सावंतवाडी ता.२५-: पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शास्त्रीय संगीत मैफिल आचार्य पं. मुकुल शिवपुत्र हे महाराष्ट्रभर फिरत कार्यक्रम सादर करत आहेत. याच उद्देशाने आज सावंतवाडी राजवाडा येथे त्यांचा गंधर्वगान होत आहे. ही खरोखरच आनंदाची बाब आहे असे मत शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी शुभेच्छा देताना मांडली. दरम्यान, यावेळी केसरकर यांच्या हस्ते पंडित मुकुल शिवपुत्र यांचा तर साथीदारांचा अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.श्रीमंत शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते पंडित कुमार गंधर्व यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने नाम. दिपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने आचार्य पंडीत मुकूल शिवपुत्र गंधर्वगान आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, श्रीमंत शुभदादेवी भोसले, अभिनेता सयाजी शिंदे, केसरकर मित्रमंडळाचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, प्रिया आचरेकर व संगीत साथीदार उपस्थित होते.

पंडित कुमार गंधर्व यांच्या प्रतिमेला पुष्पहार श्रीमंत शुभदादेवी भोसले व मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते घालून पुजन केले. त्यानंतर प्रिया आचरेकर यांचा सत्कार श्रीमंत शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.तर अभिनेता सयाजी शिंदे यांनी सर्व साथीदार कलाकारांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पंडित मुकुल शिवपुत्र यांचा सन्मान मंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला तर स्वागत राजन पोकळे यांनी केले. पं. कुमार गंधर्व यांचे सुपुत्र आणि प्रथम शिष्य असलेले पं. मुकुल शिवपुत्र हे हिंदुस्थानी अभिजात शास्त्रीय संगीताच्या दुनियेत प्रथमस्थानी विराजमान आहेत.
यावेळी श्रीमंत शुभदादेवी भोसले यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी, पंडित कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मैफिलीचा अपुर्व योग आला आहे. आपण ही मैफिल घेऊन जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्यात उपक्रम घेत आहात त्याबद्दल शुभेच्छा.

You cannot copy content of this page