गोवा येथील राष्ट्रीय बीच कराटे स्पर्धेत ३६ पदकांची केली लयलूट..
बांदा/प्रतिनिधी
गोवा-केरी येथे संपन्न झालेल्या नॅशनल बीच कॉम्बॅट कराटे स्पर्धेत आणि कराटे ट्रेनिंग कॅम्प मध्ये वेंगुर्ला येथील मार्शल आर्ट ट्रेनर किरण देसाई यांच्या बांदा, शिरोडा आणि गोवा डोजो मधील २९ स्पर्धकांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत तब्बल ३६ पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यातुन जवळपास ४५० स्पर्धक सहभागी झाले होते.
काता आणि कुमीतेमध्ये ८ सुवर्ण, १८ सिल्वर व १० कास्य पदकांची कमाई स्पर्धकांनी केली. यशस्वी स्पर्धकांना प्रशिक्षक किरण देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. श्री देसाई यांच्या बांदा, शिरोडा मधील विद्यार्थ्यांनी कराटे, कीक बॉक्सींग, बॉक्सींग, तायक्वांदो या क्रिडा प्रकारात आंतरशालेय स्पर्धामध्ये विभाग आणि राज्य स्तरीय पातळीवर गेली काही वर्षे यशस्वी सहभाग घेत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
