माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्वागत..
⚡सावंतवाडी ता.२५-:
विधानसभेचे अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांचे आज मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने संजू परब यांनी स्वागत केले.
नार्वेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. याठिकाणी भाजपचे प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, बांदा उपसरपंच जावेद खतीब, गुरुनाथ सावंत, माजी सरपंच दीपक सावंत, युवा नेते संदीप बांदेकर, आत्माराम गावडे, डेगवे उपसरपंच मधुकर देसाई यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
