मळगाव येथील अपघातातील तो कारचालक गुजरात मधील…

पोलीस तपासात निष्पन्न:लवकरच ताब्यात घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांचे स्पष्टीकरण…

⚡सावंतवाडी ता.२२-: मळगाव पेट्रोल पंपानजीक कारने धडक देऊन गंभीर जखमी झालेला ध्रुव गौरव पावसकर या पाच वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. दुचाकीला धडक देऊन पलायन केलेल्या कारचालकाला शोधण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. सदरची कार ही गुजरात येथील असल्याचे निष्पन्न झाले असून संबंधिताला लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.

You cannot copy content of this page