⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या हस्ते दादा कुडतरकर, संजय मालंडकर, सुभाष उबाळे, भाऊ डगरे यांच्या उपस्थितीत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्र मंडळ, व्यापारी मित्र मंडळ आणि पेडणेकर मित्र व शालेय मित्रमंडळाच्या नाम फलकाचे श्रीफळ वाढवून अनावरण करण्यात आले
याप्रसंगी अशोक करंबेळकर म्हणाले, सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असताना वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जात असताना ज्या समाजासाठी ते साजरे केले जातात, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो, तो ज्यावेळी हा व्यापारी वर्ग कार्यक्रम सादर करतो, त्यावेळी आम्हाला याचा मनापासून आनंद होतो.
यावेळी दादा कुडतरकर यांनी मनोगत व्यक्त केले, आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले*
या वेळी माऊली मित्र मंडळ, व्यापारी मित्र मंडळ, पेडणेकर यांचे मित्र मंडळ आणि शालेय मित्र मंडळाचे तसेच अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील सर्व व्यापारी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित सर्वांनी या सर्व मित्र मंडळाचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांना पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राजेंद्र मनोहर पेडणेकर म्हणाले,आम्ही या सर्व मित्र मंडळीच्या सहकार्याशिवाय काहीही करू शकलो नसतो, या आमच्या सर्व मित्र मंडळीच्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य होते आहे, यापुढे ही सर्वांनी असेच सहकार्य द्यावेत आणि अशीच एकजूट सदैव ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.
