स्विफ्ट कार व कँटर मध्ये अपघात…

कोलगाव येथील घटना; एक किरकोळ जखमी..

⚡सावंतवाडी ता.२२-: येथील स्विफ्ट कार व आयशर कँटर यांच्यात झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे हा अपघात आज सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास येतील कोलगाव मियासाब समाधी परिसरात घडला.

दरम्यान यात कारचालकाला किरकोळ दुखापत झाली असून यात मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दोन्ही बाजूची वाहन बाजूला करण्याचं काम सुरू आहे. मात्र वाहतूक विस्कळीत झाली आहे.

You cannot copy content of this page