रवळनाथ देवाच्या जत्रोत्सवाने होणार सांगता..
⚡सावंतवाडी ता.२२ सहदेव राऊळ : मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरातील जागर उत्सवास मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. या जागर उत्सव कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. रवळनाथ देवाच्या जत्रोत्सवाने या जागराची सांगता होणार आहे.
मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात दरवर्षी कोजागिरी पोर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत जागर उत्सव होत असतो. महिनाभर सुरू असलेल्या या जागर कालावधीत दर दिवशी मंदिरात पुराणवाचन व मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा काढली जाते.
पालखीनंतर देवाची आरती व गाऱ्हाणे झाल्यावर उपस्थित सर्वांना प्रसाद वाटप केला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेला रवळनाथ देवाच्या वार्षिक जत्रोत्सवाने या जागराची सांगता केली जाते. यंदा रवळनाथ देवाचा जत्रोत्सव २६ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या जत्रोत्सवानंतर गावातील जत्रोत्सवास प्रारंभ होतो. रोज मानकरी व ग्रामस्थ उपस्थिती दर्शवत जागराचा व पुराणवाचनाचा लाभ घेत आहेत
