⚡देवगड ता.२०-:कुणकेश्वर चांदेलवाडी येथील आंबा बागायतदार बाळकृष्ण दत्तात्रय बोंडाळे(८०) यांचे सोमवारी सकाळी ८.३० वा.सुमारास राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांचा पश्चात दोन मुलगे, एक विवाहीत मुलगी, सुना, नातवंड
असा परीवार आहे.कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळाचे माजी
कार्यवाह, देवस्थान ट्रस्टस्टचे माजी खजिनदार या पदावर त्यांनी
काम केले होते.भाजपाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते
होते.सामाजीक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता.आंबा
बागायतदार शैलेश व सुजित बोंडाळे यांचे ते वडील होत.
