अवैध चिरे वाहतुक करणा-या ट्रकवर कारवाई…

सुमारे १ लाख ४६ हजार ८०० रूपये रकमेची दंडात्मक कारवाई..

⚡देवगड ता.२०-: देवगड तहसीलदारांनी अवैध चिरे व वाळू वाहतुक करणा-यांवर धडक कारवाई मोहीम राबवीली असून सोमवारी अवैध चिरे वाहतुक करणा-या ट्रकवर लिंगडाळ तिठा येथे कारवाई करून १ लाख ४६ हजार ८०० रूपये रकमेचा दंड ठोठावला आहे.देवगड तहसिलदार रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे मंडल अधीकारी व वळीवंडे;े तलाठी यांनी सोमवारी सायंकाळी ४
वा.सुमारास लिंगडाळ तिठा येथे अवैध चिरे वाहतुक करणा-या
ट्रकवर कारवाई केली.हा ट्रक देवगड तहसील कार्यालय
परीसरात आणण्यात आला असून ट्रकवर सुमारे १ लाख ४६ हजार ८००
रूपये रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page