कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप रावराणे यांनी दिल्या शुभेच्छा..
⚡वैभववाडी ता१९-:
सावंतवाडी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी वैभववाडी तालुका कबड्डी संघ रवाना झाला आहे. जिल्हा बँक संचालक, तालुका कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष श्री. दिलीप रावराणे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
तसेच खेळाडूंना आर्थिक मदतीचा हात दिला. गेली अनेक वर्षे जिल्हा कबड्डी फेडरेशन उपाध्यक्ष पदावर दिलीप रावराणे कार्यरत आहेत. जिल्हा कबड्डी संघटनेत त्यांचे फार मोठे योगदान आहे.
यावेळी दिलीप रावराणे म्हणाले, ग्रामीण भागातील खेळाडूंना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. खेळाडूंनी सांघिक खेळाच्या जोरावर यश संपादन केले पाहिजे. तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले पाहिजे.
वैभववाडी तालुका संघात आकाश पवार, सुशील पवार, साहिल शेळके, सुरज पाडावे, ऋषिकेश तांबे, शुभम भुरके, गौरव शेलार, प्रसाद तांबे, समर्थ सावंत, सुमित साटम, मकरंद नारकर, तसेच श्रेया साळुंखे, ऋतुजा रावराणे, प्रतीक्षा शेलार, प्रेरणा तावडे, ऋतुजा साळुंखे, मानसी दळवी, प्रगती तावडे, प्राजक्ता आग्रे, प्रणवी सावर्डेकर यांचा समावेश आहे.
याप्रसंगी राष्ट्रीय पंच प्रशिक्षक मधुकर पाटील, योगेश साळुंखे, ऋतुराज सावंत, अक्षय मोहिते, अंकित तांबे, स्वप्निल कदम, श्रीकांत राणे आदी उपस्थित होते.
