सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांचे माडखोल ग्रामस्थांना आवाहन
⚡सावंतवाडी ता.१९-: मराठ्यांच्या हक्कासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून लढा उभारला आहे, प्रत्येक मराठा बांधवाने त्यांना साथ देणे काळाची गरज आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या जरांगे पाटील यांच्या सभेला माडखोल गावातून मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सिताराम गावडे यांनी माडखोल मराठा समाज बांधवांनी केलेल्या लक्षणे उपोषणाच्या सांगता प्रसंगी बोलताना केले
सकल मराठा समाज माडखोल च्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला साथ देण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले, या उपोषणाला गावातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली, उपोषणाची सांगता सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन करण्यात आली, यावेळी सिताराम गावडे बोलत होते, ही आरपारची लढाई आहे ,आता नाही तर कधीच नाही ,म्हणून प्रत्येकाने पेटून उठले पाहिजे, आपापसातील मतभेद बाजूला ठेवून निव्वळ मराठा दात म्हणून सर्वांनी एकत्र या व आपली एकीची वज्रमूठ कायम ठेवून आपल्या हक्काचे आरक्षण मिळवून घ्या असे आव्हान केले.
यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे… एक मराठा, लाख मराठा .
कोण सांगतोय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी माडखोल उपसरपंच कृष्णा राऊळ, माजी सरपंच संजय लाड, आनंद राऊळ, राजन राऊळ, सूर्यकांत राऊळ, कृष्णा राऊळ, योगेश लाड, अमित राऊळ, मेघनाथ राऊळ, अजित नाईक, प्रकाश देसाई, भरत राऊळ, गोविंद दळवी, विश्वास राऊळ, सुबोध राऊळ, विशाल राऊळ, निखिल गावडे, तेजस राऊळ, सुनिल राऊळ, सत्यवान राऊळ, यशवंत गावडे, कृष्णा राऊळ, विनायक राऊळ, स्वप्निल लातये, सुरज लातये, आत्माराम लातये, विजय बंड, नामदेव राऊळ, बापु राऊळ, लखन आडेलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
