चिपळूण येथील विघ्नहर्ता ग्रुपतर्फे साकारण्यात आली सिंधुदुर्ग किल्ला प्रतिकृती

⚡मालवण ता.१९-: विघ्नहर्ता ग्रुप, चिपळूण तर्फे यावर्षी दिवाळी निमित्त सिंधुदुर्ग किल्ला प्रतिकृती साकारून कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर व सिंधुदुर्ग किल्ला यांचा महत्वपूर्ण इतिहास सर्वांपर्यंत पोहचविला होता.याबाबत श्री देव रामेश्वर देवस्थान तर्फे विघ्नहर्ता ग्रुपचे आभार मानण्यात आले.


श्री देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ कांदळगाव तर्फे कमिटीचे उपसचिव विशाल सत्यवान राणे यांनी चिपळूण येथे या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रतिकृतीला भेट देऊन विघ्नहर्ता ग्रुपचे संस्थापक साहिल रानडे, आणि वेदांत पवार, विपुल गोगटे, इतर कार्यकर्ते यांचे आभार मानत त्यांना आभार पत्र आणि श्री देव रामेश्वर प्रतिमा देऊन सन्मानित केले. त्याचप्रमाणे विघ्नहर्ता ग्रुपकडून देखील श्री. राणे यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

You cannot copy content of this page