⚡मालवण ता.१९-: मालवण तालुक्यातील मसुरे मावची मूळमाया बिळवस येथील श्री सातेरी देवी जलमंदिर मध्ये दि. २३ नोव्हेबंर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सातप्रहारचा अखंड हरिनाम सप्ताह तर दि. २५ नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी दिवशी देवीचा कार्तिक जत्रोत्सव होणार आहे.
२३ रोजी हरीनाम सप्ताहसाठी भावीक भक्तगणांनी भजन मेळ्यासहित उपस्थित राहून सहभागी व्हावे व देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तर २५ नोव्हेंबर रोजी देवीचा कार्तिक जत्रोत्सव होणार असून त्यावेळी देवीची विधीवत पुजाअर्चा, रात्री पुराण वाचन पालखी प्रदक्षिणा, ओट्या भरणे व त्यानंतर रात्री १२ वाजता चेंदवणकर गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ कवटी यांचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व भाविकांची लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळ व समस्त बिळवस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
