⚡मालवण ता.१९-: ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा (फेस्कॉम संलग्न) वर्धापन दिन मालवण भरड येथील लिलांजली हॉलमध्ये साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विविध कलागुण सादर करत या कार्यक्रमात रंगत आणली.
प्रारंभी डॉ. सुभाष दिघे यांनी स्वागत केले. यावेळी दिवाकर पणशीकर यांचा ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. म्हापणकर, काळे, डॉ. दिघे, चव्हाण करलकर, माणगावकर यांनी मालवणी कविता, अभंग, विनोदी प्रसंगांचे सादरीकरण केले. बुवा भालचंद्र केळुसकर यांनी गीते सादर केली. महेंद्र मराठे, वीणा दळवी, गरिमा काजरेकर यांनीही गीते सादर केली. त्यांना भालचंद्र केळुसकर व विशाल केळुसकर यांनी संगीत साथ दिली. यावेळी बहुसंख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
