कुडाळ डिव्हिजनच्या कंत्राटी कामगारांची उद्या बैठक…

⚡कुडाळ ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ डिव्हिजनच्या कंत्राटी कामगारांची अतिशय महत्त्वाची बैठक उद्या २० नोव्हेंबर रोजी कुडाळ विभागीय कार्यालय कुडाळ येथे मा. कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटना सिंधुदुर्गचे मार्गदर्शक व कामगार नेते अशोक सावंत, जि. प. माजी सभापती जयेंद्र रावराणे, संदीप देवगड, शेखर गावकर वेंगुर्ला, प्रितेश राऊळ वेंगुर्ला, बांदा उपसरपंच जावेद खतिब, संजू परब सावंतवाडी, अशोक तोडणकर, मालवण मच्छीमार नेते छोटू सावजी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
बाह्यस्त्रोत कामगारांच्या समस्यांबाबत वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्ग व ठेकेदार यांच्या समवेत ही संयुक्त बैठक होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ डिव्हिजनच्या कंत्राटी कामगारांनी या बैठकीला ठीक 10.00 वाजता विभागीय कार्यालय कुडाळ येथे उपस्थित रहावे अशी आवाहन वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

You cannot copy content of this page