⚡कुडाळ ता.१९-: राष्ट्रवादी काँग्रेस कुडाळ शहर यांच्या वतीने किल्ले बनविणे स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे परीक्षण मंगळवार, २१ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. तर अंतिम निकाल २२ नोव्हेंबर रोजी होणार असून बक्षीस, ट्रॉफी, प्रमाणपत्र वितरण होईल. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ३ हजार २३ रुपये रोख, चषक आणि सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक २ हजार २३ रू. तृतीय क्रमांक १ हजार २३ तसेच सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी :
ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर : ९७३०३३१५१५
शहर अध्यक्ष युवक : प्रथमेश माने, (८४३२३०५०९०)
शहर उपाध्यक्ष : (राष्ट्रवादी बेसिक) विराज बांदेकर ७०५८३२३२९९ यांच्याशी संपर्क साधावा.
