तळेरे येथे आयोजित चकली
स्पर्धेत रुची भोगले प्रथम

⚡कणकवली ता.१८-: तळेरे येथे दिपावली निमित्त आयोजित केलेल्या चकली स्पर्धेत दारूम येथील रुची रवींद्र भोगले यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा असलदे येथील दीविजा वृध्दाश्रम, सुनील तळेकर ट्रस्ट व वाचनालय आणि प्रज्ञांगन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेचे उद्घाटन दीविजा वृध्दाश्रमचे सचिव संदेश शेट्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि सूर्यकांत तळेकर यांच्या हस्ते स्व. सुनील तळेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, उपाध्यक्ष राजू वळंजू, सचिव मिनेश तळेकर, प्रज्ञांगनच्या श्रावणी मदभावे, राजू जठार, शशांक तळेकर, स्पर्धेचे परीक्षक
साक्षी कदम, चित्रा जठार, शारदा आंबेरकर, प्रा. हेमंत महाडिक आदी उपस्थित होते.

दरवर्षी दिपावली निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षीही चकली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम – रुची रवींद्र भोगले (दारूम), द्वितीय – स्वप्नाली पुंडलिक भोगले (तळेरे), तृतीय – निहारीका सुनील नादकर (नाद), उत्तेजनार्थ – पवन भोजू पवार (कासार्डे), नेत्रा निकेत पावसकर (तळेरे), निवेदिता बजरंग मोहिते या विजेत्यांना अनुक्रमे रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच, सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी परीक्षक साक्षी कदम, सोनिया केळुसकर, रोशनी बागवे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली मांजरेकर यांनी तर आभार मिनेष तळेकर यांनी मानले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्मितेष पाश्टे, दत्तराज राणे, शुभम परब, विनय गोडे, रोशन कांबळे, जयश्री तायशेट्ये, तेजल सावंत, तन्वी चिंदरकर, नयन गुंडये, वाचनालयाचे ग्रंथपाल साक्षी तळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page