⚡कणकवली ता.१८-: सांगवे आंबेडकरनगर येथील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.सांगवे समाजमंदिरच्या अपूर्ण बांधकामाच्या मुद्द्याला अनुसरून शिवसेनेवर विश्वास ठेवत प्रवेश केला असल्याचे सांगण्यात आले.
सांगवे आंबेडकरनगर येथील संतोष कांबळे , महेश कांबळे , दिनकर कांबळे , महेंद्र चव्हान , या सह अनेकांनी कुणाल सावंत, सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख सतीश सावंत , तालुका प्रमुख प्रथमेश सावंत , युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके यांच्या नेतृत्वाखाली सतीश सावंत यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विभागप्रमुख आनंद आचरेकर , युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, आर. एच. सावंत, दिनेश वाळके, गणेश शिवडावकर, संजय सावंत, अरविंद सावंत, सचिन सावंत, सुदर्शन रासम, राजू टाकेकर, संदेश गुरव, निलेश सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.
