आम.श्रीकांत भारतीय:नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा केला सत्कार
⚡सावंतवाडी ता.१८-: जनतेने ज्याप्रकारे आपल्यावर विश्वास टाकून निवडून दिले ते आपण सार्थकी लावून त्यांचे प्रश्न मार्गी कसे लागतील यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरून त्यांच्या कायमस्वरूपी देखील लक्षात राहावे असे काम आपण करावे असे प्रतिपादन भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी केले.
दरम्यान पक्षाकडून जे काय सहकार्य लागेल ते निश्चितच आपल्याला केले जाईल, असे आश्वासन देखील त्यांनी उपस्थित नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांना दिले. येथील सावंतवाडी विधानसभा संपर्क कार्यालयात काल नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई ,महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली, मनोज नाईक, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
