⚡सावंतवाडी ता.१७-:
सेवानिवृत्त नायब तहसीलदार वामन राजाराम कदम( वय -७४-रा . कुंब्रल देऊळवाडी) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी ,पाच मुलगे एक भाऊ दोन बहिणी, सुना ,नातवंडे, पुतणे चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे
ते गोवा राज्यात महसूल विभागात होते. त्यांनी उत्तर व दक्षिण गोव्यातील तालुक्यांमध्ये महसूल विभागात चांगली कामगिरी केली होती पेडणे गोवा येथे ते नायब तहसीलदार पदावरून सेवानिवृत्त झाले होते. गावातील सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचे नेहमीच योगदान असे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते गोवा मेडिकल कॉलेज मधे नोकरीस होते. त्या काळी त्यांनी गावातील तसेच पंचक्रोीतील अनेक रु्णांना मदतीचा हात दिला होता.
त्यानंर त्यांनी महसूल विभागात नोकरी पतकरली होती.
ते पेडणे गोवा येथे नायब तहसीलदार पदावरून सेवानिवृत्त झाले.
दरम्यान निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे पत्रकार समीर कदम यांचे ते वडील होत
