बांदा, शिरोडा बसस्थानकाचे होणार नूतनीकरण…

मंत्री केसरकर यांनी मंजूर करून घेतला निधी:प्रवाशी, मतदारांतून व्यक्त होत आहे समाधान

⚡सावंतवाडी ता.१७-: शालेय शिक्षण मध्ये दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून शिरोडा व बांदा या बस स्थानकांचे नूतनीकरण होणार आहे. शिरोडा बस स्थानकासाठी दोन कोटी रुपये तर बांदा बस स्थानक नुतनीकरणासाठी 67 लाखाचा निधी मंजूर झाल्याची माहिती मंत्री केसरकर यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान ही नूतनीकरण कामे पूर्ण होऊन बांदा आणि शिरोडा बस स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी सुसज्ज पद्धतीने तयार होणार आहेत.

दरम्यान यासाठी मंत्री केसरकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रवाशांकडून तसेच मतदार संघातील नागरिकांकडून मंत्री केसरकर यांचे आभार मानले जात आहेत.

You cannot copy content of this page