सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे: बाळू सावंत यांचे आवाहन..
⚡बांदा ता.१७-: बांदा मराठा समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन मंगळवार दिनांक २१ रोजी दुपारी ३ वाजता बांदा विकास सोसायटीच्या सभागृहात करण्यात आले आहे.
या सभेत मराठा समाजाची कार्यकारिणी निवड, वार्षिक कार्यक्रमांचा लेखा जोखा, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कुडाळ येथे होणाऱ्या सभेचे नियोजन, समाजातील बांधवांसाठी राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, आरोग्य विषयक, सामाजिक उपक्रम तसेच मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी भविष्यातील निर्णय याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत.
या सभेसाठी शहरातील मराठा समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा समाजाचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत, सचिव म. गो. सावंत यांनी केले आहे.
