पदाधिकारी आक्रमक ; संबधिताचा शोध घ्या ,अन्यथा पोलिस ठाण्यात ठाण मांडू..
⚡सावंतवाडी ता.१७-: दोडामार्ग शहरामध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या बदनामीचे बॅनर दोडामार्ग शहरामध्ये लावण्याची घटना ताजी असतानाच सावंतवाडी शहरात दिवाळीनिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छाचे बॅनर अज्ञताकडून पाडण्यात आल्याचा प्रकार आज उघडकीस आला या घटनेमुळे सावंतवाडी शिंदे शिवसेना आक्रमक झाली असून बॅनर पडणाऱ्या संबंधिताचा शोध घ्या अन्यथा पोलीस ठाण्यातच ठाण मांडू असा इशारा पोलीस प्रशासनाला दिला आहे.
शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज यासंदर्भात पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबतचे निवेदन सादर केले.
यावेळी तालुकाप्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, महिला शहर प्रमुख भारती मोरे, गजानन नाटेकर, नीलिमा चलवाडी, परशुराम चलवाडी, आधी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
