श्रीकांत भारतीय ; सावंतवाडी विधानसभेची जागा व उमेदवारी कोणाला निवडणुकी आधी स्पष्ट होईल..
⚡सावंतवाडी ता.१७-: लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखाली महायुतीने एकत्र लढणार आहोत, त्यामुळे सावंतवाडी विधानसभेची जागा आणि उमेदवारी कोणाला हे जेव्हा तेव्हा स्पष्ठ होणार आहे सध्यातरी आमचा लक्ष हा २०२४ च्या लोकसभेवर केंद्रीत असल्याचे स्पष्टीकरण भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्रीकांत भारतीय यांनी आज येथे दिले.
तर अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आणखीन आत्मविश्वास वाढला असून मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभेत महाविजय प्राप्त करु असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजीत देसाई, दिलीप भालेकर केतन आजगावकर आदी उपस्थित होते.
