अ भा अं नि समितीची रविवारी सभा…

⚡मालवण ता.०३-: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गची कार्यकारीणीची सभा अँड. राजीव बिले यांचे अध्यक्षते खाली रविवार दि ५ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठिक ३ वा . संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ येथे आयोजित केली आहे .

या सभेमध्ये जिल्हा कार्यकारीणीचा विस्तार करणे आणि जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जादूटोणा विरोधी कायदाची प्रात्यक्षिकासह कार्यशाळा आयोजित करण्यासंबंधी नियोजन , तसेच जिल्ह्यांमध्ये शाळा, विदयालये, कॉलेज व गावागावांमध्ये शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा समजून सांगण्यासाठी व्याख्याने आयोजित करणे, याबाबतचे नियोजन केले जाणार आहे.
तरी अ भा अं नि स मध्ये काम करू इच्छिणाऱ्या सुजाण नागरिकांनी , सभासदांनी, हितचिंतकानी सभेस उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा संघटक विजय चौकेकर आणि जिल्हा सचिव अजित कानशिडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे .

You cannot copy content of this page