तातडीने डागडुजी करा:राष्ट्रवादीचे काँग्रेसचे गौरांग शेर्लेकर यांची मागणी
⚡बांदा ता.०३-: शेर्ले तिठा ते बांदा तेरेखोल नदीपर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सचिव गौरांग शेर्लेकर यांनी केली आहे.
हा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मंजूर करण्यात आला आहे. मात्र रस्त्याचे काम करण्यासाठी वेळकाढू करत असल्याचा आरोप शेर्लेकर यांनी केला आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात राहदारी असते.
शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक व्यापारी, आजारी व्यक्ती बांद्यात येण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून वाहतुकीसाठी जीवघेणा बनला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तात्काळ कार्यवाही न केल्यास प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा शेर्लेकर यांनी दिला आहे.
