केसरकर मित्रमंडळ आणि मुजीब शेख मित्रमंडळाचे आयोजन:गोविंदा पथकांना सहभाग घेण्याचे आवाहन..
⚡सावंतवाडी ता.०६:- येथील मुजीब शेख मित्र मंडळ व दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या वतीने उद्या दि.७ रोजी “दहीहंडी” चे आयोजन करण्यात आले आहे हा उत्सव गांधी चौकात साजरा होणार आहे. तर यावेळी सहभागी गोविंदा पथकांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त गोविंदा पथकाने आणि नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे प्रमुख प्रवीण गावडे व मुजीब शेख यांनी केले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले त्यात असे नमूद करण्यात आले की गेली काही वर्ष सावंतवाडी येथील आकर्षक आणि नाविन्यपूर्ण दहीहंडी उत्सव अशी ओळख या मंडळाच्या उत्सव निर्माण झाली आहे त्याच निमित्ताने यावर्षी देखील हा उत्सव मोठ्या उत्सवाच्या वातावरणात साजरा करायचाय गांधी चौक येथील वसंत प्लाझा इमारतीच्या परिसरात उद्या दि.७ रोजी होणाऱ्या या दहीहंडी उत्सवात विविध रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहे.यात महिला पथक देखील खास सहभागी होणार आहे तरी विविध गोविंदा पथकान या दहीहंडी उत्सवात सहभागी होण्याचे व तसेच सर्व नागरिकांना दहीहंडी उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मुजीब शेख मित्र मंडळ कडून करण्यात आले आहे.
