सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी पुढाकार:स्वखर्चातून केली व्यवस्था..
⚡सावंतवाडी ता.०६-: येथील सामाजिक कार्यकर्ते श्री परशुराम चलवाडी यांच्याकडून सावंतवाडी जिमखाना मैदान नजीक असलेल्या पानंदीमध्ये स्वखर्चातून पुढाकार घेत सोलर लाईटची व्यवस्था करून देण्यात आली आहे याचे उद्घाटन महिला शिवसेना जिल्हाप्रमुख सौ.नीता कविटकर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नसल्या कारणाने त्या ठिकाणाहून येणार जाणाऱ्या पादचाऱ्यांना समस्या उद्भवत होत्या. व वारंवार निवेदने देऊन सुद्धा त्या ठिकाणी शासनामार्फत कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार सामाजिक कार्यकर्ते श्री. परशुराम चलवाडी यांनी स्वखर्चातून त्या ठिकाणी सोलर लाईटची व्यवस्था करून दिली. सोलर लाईटची व्यवस्था करून दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत श्री परशुराम चलवाडी यांचे मानले आभार.
यावेळी उपशहर प्रमुख सौ नीलिमा चलवाडी, श्री परशुराम चलवाडी, शाखाप्रमुख भारती परब, सीमा सोनटक्के, पूजा नाईक, साधना मोरे आदी उपस्थित होते.
