⚡वेंगुर्ला ता.२३-: महाराष्ट्र राज्य उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वेंगुर्ला शहरातील सातेरी मंदिर नजिकच्या शाळा नं. ४ या शाळेतील वेद अभिषेक वेंगुर्लेकर आणि हंसिका जगन्नाथ वजराटकर हे दोन विद्यार्थी शहरी राज्यस्तरावरील शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
या दोन्ही विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका लिना नाईक व मुख्याध्यापिका संध्या बेहेरे यांचे मार्गदर्शन लाभले. या दोन्ही विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक संध्या बेहेरे, शिक्षक संतोष परब, संतोष बोडके, तसेच पालक, शालेय व्यवस्थापन समिती व नागरिकांतून अभिनंदन करण्यात आले आहे.
फोटो – वेद वेंगुर्लेकर आणि हंसिका वजराटकर
