⚡सावंतवाडी ता.२३-: सन २०२२ – २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मिलाग्रीस च्या ९ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले.
तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे देखील अभिनंदन करण्यात आले.यावेळी उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल , पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे-

इयत्ता आठवी (इंग्रजी माध्यम)
१) कु.जान्हवी ऋषिकेश गावडे.(७२.४८% जिल्ह्यात १३ वी)
२) कु. आदी उत्तम पाटील (७८.४८% जिल्ह्यात १४ वा)
३) कु. आशीर्वाद विराज मसुरकर (६९.१२% जिल्ह्यात २१ वा)
४) कु . अथर्व विठ्ठल सावंत (६७.७८% जिल्ह्यात २८ वा)
५) कु.विलास रावजी सावंत (६४.४२% जिल्ह्यात ४१ वा)
इयत्ता पाचवी (इंग्रजी माध्यम)
१) कु . शुभंकर सुदीप पाटकर (७८% जिल्ह्यात १३ वा)
२) कु . श्रीया राजेश म्हालटकर (७२.६६% जिल्ह्यात ३० वी)
३) कु . तेजल बाबुराव जाधव (७०% जिल्ह्यात ४१ वी)
इयत्ता पाचवी ( सेमी इंग्रजी माध्यम)
१) कु . मनिष मणिपाल राऊळ (७८.६६% जिल्ह्यात १२ वा)
