शिक्षणमंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविला उपक्रम
बांदा/प्रतिनिधी
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डेगवेतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डेगवे गावातील सर्व शेतकरी बांधवांना नारळ, सुपारी, काजूच्या कलमाच्या रोपांचे वाटप केले. हा कार्यक्रम स्थापेश्वर येथे संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास डेगवे आंबेखणवाडी, जांभळवाडी, फणसवाडी, बाजारवाडी, मोयझरवाडी, वराडकरवाडी, मिरेखणवाडीतील शेतकरी बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमात पावसाळ्यातील रानभाज्या व त्याचे फायदे या विषयावर दापोली कृषी विद्यापीठामध्ये प्रशिक्षण घेणारे पवन विवेक केसरकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेनेचे सावंतवाडी उपतालुकाप्रमुख तथा डेगवेचे माजी सरपंच मंगलदास देसाई, डेगवे ग्रामपंचायतीचे सदस्य तथा उपविभाग प्रमुख विजय देसाई, माजी सरपंच सौ. वैदेही देसाई, सौ. वैष्णवी केसरकर, वामन देसाई, योगेश मांजरेकर, विवेक केसरकर, अनील देसाई, शाखा प्रमुख सिताराम देसाई, सदस्य रुपाली देसाई यांच्यासह डेगवे ग्रामस्थ उपस्थित होते.
