⚡कणकवली ता.२२-: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना चादर व फळे वाटप कार्यक्रम करण्यात आला. युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस आरोग्य क्षेत्रातील सामाजिक उपक्रमानी साजरा करण्यात आला. कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना चादर व फळे वाटप.यावेळी जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस रुजाय फर्नांडिस, ग्रां. प. सदस्य भावना तावडे, रोहन पाताडे, कृष्णा गांवकर, वामन चव्हाण, शुभम करंजेकर, अक्षय कासले, प्रज्ञेश देसाई, डॉ. श्रीकृष्ण बागल, इन्चार्ज सिस्टर पायल निकम, वॉर्ड सिस्टर करिश्मा चव्हाण, कक्ष सेवक सुरेश घाग, उपस्थित होते.
