अखेर ते झाड विजवीतरणकडून बाजूला…

ग्लोबल महाराष्ट्र च्या वृत्ताची दखल: भाजप- राष्ट्रवादीने वेधले होते लक्ष..

⚡सावंतवाडी ता.२२-: येथील माठेवाडा झिरंगरोड भाईजाण मंडम शेजारी बेलडे माडाचे झाड कोसळण्याच्या स्थितीत होते याबाबत ग्लोबल महाराष्ट्र चैनल वर वृत्त प्रसिद्ध होताच वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ते झाड काढले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक तथा शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर यांच्या उपस्थितीत हे झाड काढण्यात आले.

याबाबत भाजपचे युवक शहराध्यक्ष संदेश टेमकर यांनी प्रशासनाचा यादी लक्ष वेधले होते मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने त्यांनी आज ग्लोबल महाराष्ट्राच्या माध्यमातून वृत्त प्रसिद्ध केल्याने घटनास्थळी वीज अधिकाऱ्यांनी जाऊन ते झाड काढलं त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page